‘महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही’ असं मी सांगू शकत नाही – चंद्रकांत पाटील

0
265

मुंबई,दि.२९(पीसीबी) – महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे ते ‘बीबीसी मराठी’या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपकडून केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं.