नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, मात्र ते कोरोना रोखू शकले नाही – राहुल गांधी

0
257

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) – नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले, असं ट्विट करत काँग्रेसचे नेते राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.

कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांच्या पीएफमधील पैसेच सध्या आधार बनले आहेत. लोक त्याच पैशातून आपल्या गरजा पूर्ण करत आहेत. गेल्या चार महिन्यांत ईपीएफओमधून जवळपास 30 हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत अशी माहिती राहुल गांधींनी ट्विट केलेल्या वृत्तातून देण्यात आली आहे.

याआधीही काही दिवसांपर्वी राहुल यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल, असं म्हटलं होतं.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.