महाराष्ट्रातील सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात   

0
453

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज (गुरूवार) सकाळी ७ वाजेपासून सुरूवात झाली आहे. १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशातील ९१ मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान  होणार आहे. महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात निवडणूक  होत आहे.

नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. या सात जागांसाठी एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ हजार ९१९ मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वाधिक ३० उमेदवार हे नागपूर मतदारसंघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चुरशीची लढत  होत आहे. नागपूरची जागा कोण जिंकणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.