आंध्रप्रदेशात उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळले 

0
473

अनंतपूर, दि. ११ (पीसीबी) –  लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज (गुरूवार) देशभरात   सुरवात झाली आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशात लोकसभा उमेदवाराने  ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळल्याची घटना  समोर आली आहे.  या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला  ताब्यात घेण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशातील अनंतरपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना मधुसुदन यांनी अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळले . या प्रकारानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना  ताब्यात घेतले आहे.