महापालिकेतील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या तर 17 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती

0
161

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. तर, 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंतापदी बढती दिली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिका-यांच्या बदल्या, बढत्यांचा धडाका सुरु आहे. स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता, कार्यकारी अभियांत्यांच्या पाच दिवसांपूर्वी बदल्या केल्या होत्या. आता स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदल्यांत्यांचा धडाका सुरु आहे.

महापालिका कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. उपअभियंत्यांनी बदली दिलेल्या विभागात आज (शुक्रवार) पर्यंत रुजू व्हावे. रुजू अहवालाची प्रत प्रशासन विभागाकडे पाठवावी. आदेशाच्या 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कार्यभार हस्तांतरण करावे. तसा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना द्यावा. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेतील स्थापत्या विभागातील 17 कनिष्ठ अभियंत्यांना सेवाज्येष्ठतेनुसार उपअभियंतापदी बढती देण्यात आली. उपअभियंत्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी 13 जून 2022 रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. कनिष्ठ अभियंत्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता इत्यादी सेवाज्येष्ठता पडताळली. त्यानुसार पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंतापदी बढती देण्यात आली. महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता आहे. त्यामुळे बढती मिळालेल्या अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता स्थापत्या या पदासह उपअभियंता स्थापत्या या पदोन्नतीच्या पदाचे कामकाज सध्या आस्थापना असलेल्या विभागात पुढील आदेशापर्यंत करायचे आहे. पदोन्नतीमुळे सविस्तर पदस्थापना अलाहिदा देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.