महापालिकेच्या शाळेतील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांसाठी ३६ लाखांच्या खर्चास स्थायीची मंजुरी 

0
553

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील माध्यमिक शाळेतील ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या व ३५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या अंध व अपंग गुणवंत विद्यार्थांना  महापालिकेच्या वतीने बक्षीस देण्यात येतात. त्यासाठी  सुमारे ३० लाख ७५ हजार  रूपयासह १२ कोटी रूपयाच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवार) मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

कासारवाडी जलतरण तलावास संरक्षण भिंत बांधणे व रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे ७४ लाख ६२ हजार खर्चास बैठकीत  मंजुरी देण्यात आली.

तसेच रावेत जलशुध्दीकरण केंद्रांचे जागेतून पर्यायी रस्त्यासाठी  महापालिकेस हस्तांतर करावयाच्या जागेचे हस्तांतर मूल्य ६ कोटी ५६ लाख महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळास अदा करावयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ९ शाहूनगर येथे दिवंगत सदाशिव बहीरवाडे मैदाना भोवती सीमाभिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे ५६ लाख ६७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ धावडेवस्ती मधील भैरवनाथ शाळेशेजारील नाल्यावर सी डी वर्क बांधणेकामीयेणा-या सुमारे ५२ लाख ५० हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.४ रामनगर बोपखेल येथील नाला पाईपलाईन टाकून बंदिस्त  करण्याच्या कामासाठी सुमारे १ कोटी ३४ लाख रूपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

रस्ते खोदाई परवानगीची प्रक्रिया संगणकीय प्रणाली व्यवस्थापन करणेकामी व मोबाईल अॅप विकसित  करण्यासाठी  सुमारे २२ लाख ६३ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत  मंजुरी देण्यात आली.