महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी जायचयं? ऑनलाईन नोंदणी करा

0
1099

पिंपरी दि. १८(पीसीबी) – उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यास येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. तिकीटे घेण्यासाठी खिडकी जवळ खूप गर्दी होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये जलतरण तलावावर क्षमतेप्रमाणे नागरिकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जातो. पण, ज्या नागरिकांना त्या बॅचमध्ये तिकीट मिळत नाही. ते नागरिक तक्रार करत असल्याने महापालिकेने आजपासून ऑनलाईन पद्धत सुरु केली आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील जतरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करुन बॅचचे आरक्षण करावे लागणार आहे.

महापालिकेच्या वतीने सध्या निगडी, पिंपळेगुरव, पिंपरीवाघेरे आणि कासारवाडी हे चार जलतरण तलाव नागरिकांना पोहोण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. नेहरुनगर, यमुनानगर, संभाजीनगर येथील तलावात पाणी भरण्याची कार्यवाही सुरु आहे. पाणी भरताच पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिकी कामकाज सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हे तीनही तलाव पोहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे जतलतरण तलावावर पोहण्यास येणा-या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तलावावर गर्दीही वाढत आहे. तिकीटे घेण्यासाठी खिडकी जवळ खूप गर्दी होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये जलतरण तलावावर क्षमतेप्रमाणे नागरिकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जातो. पण, ज्या नागरिकांना त्या बॅचमध्ये तिकीट मिळत नाही. ते नागरिक तक्रार करतात. त्यामुळे महापालिकेने ऑनलाईन पद्धतीने जलतरण तलावासाठी बॅचचे आरक्षण काढण्यास सुरुवा केली आहे. पोहण्यासाठी 21 ते 26 मे 2022 या कालावधीतील पहिला पास धारकांची सकाळी 6 ते 7 ची बॅचच वगळता उर्वरित 7 बॅचचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले.

‘असे’ करा ऑनलाईन बॅचचे आरक्षण!
# महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील जतरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करणे
# पोहणा-या नागरिकाने, पाल्याने, पालकांनी आपले नोंद खाते तयार करावे. ही प्रक्रिया एकदाच करावी लागेल
# नोंद केल्यानंतर लॉगइन करावे. इच्छित जलतरण तलाव निवडून तारीख, वेळ निश्चित करावी. पोहणा-यांची संख्या जास्तीत-जास्त तीन लोकांची नोंद करु शकता. पोहणा-या नागरिकाचा आधार नंबर या ठिकाणी नोंद करावा लागेल.
# यानंतर निवडलेल्या पोहणा-यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दहा रुपये या दराने ऑनलाईन पेमेंट करणे
# पेमेंट केल्यानंतर तो सीरियल नंबर हा लक्षा ठेवावा. निवडलेल्या तलावावर प्रवेशाच्या वेळेस हा नंबर संबंधित कर्मचा-यांना सांगून आपली नोंद प्रमाणित करावी.
# जलतरण तलाव सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने बॅचचे आरक्षण केल्यानंतर तलावावर येताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.