महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं – अनंतकुमार हेगडे

0
301

मुंबई,दि.३(पीसीबी) – संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केल आहे.बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात हेगडे बोलत होते.

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं. अशा लोकांना भारतात महात्मा गांधी म्हणून कस काय संबोधलं जातं?, असं हेगडे म्हणाले आहेत.

हेगडे यांनी “जेव्हा मी आपला स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो तेव्हा माझं रक्त उसळायला लागतं. असा इतिहास सांगितल्यामुळे असे लोक देशात महात्मा बनले आहेत” अशा शब्दात महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती. देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही, असंही हेगडे यांनी म्हटलं आहे.