मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे; मीच पुन्हा निवडून येणार – खासदार उदयनराजे

0
683

पुणे, दि. ११ (पीसीबी) –  मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, मला केवळ समुद्राची लाट माहीत आहे, असा टोला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. आज (सोमवार) बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले की,  मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपणाला फक्त समाजकार्य करायचे आहे. मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे, असे म्हणत  पुन्हा एकदा साताऱ्यातून निवडून येणार , असा विश्वास  उद्यनराजे यांनी व्यक्त केला.

आमदार शिवेंद्रराजे आणि माझ्यात मनोमिलन होण्यासाठी आमचे तुटले कधी होते? असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी केला. आम्ही एकदिलाने निवडणुकांना सामोरे जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात समेट घडवून दोघांचे मनोमिलन घडवून आणले होते.