“ममता बँनर्जीचे छगनराव भुजबळांनी अभिनंदन करताना झाशीची राणी उल्लेख केला तर पाटलांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या?”

0
260

पिंपरी, दि.०३ (पीसीबी) : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल कॉग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बँनर्जी यांनी आज इतिहास घडवित हँट् ट्रिक साधली. कोरोनाची दुसरी लाट असतानाही त्यांच्या विरोधात अख्खी भाजपची फौज प्रचारात उतरली असताना देखील एका पायावर बंगाल जिंकले. एक महिला म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. या निकालावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तृणमूल कॉग्रेस नेत्या ममता बँनजी यांचे पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस विजयाबाबत अभिनंदन केले. त्यांचा झाशीची राणी म्हणून उल्लेख केला यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पोटशूळ उठला व मा.छगनरावजी भुजबळ यांना तुम्ही जामिनावर सुटला आहात, फार महागात पडेल अशी धमकीची भाषा वापरली.

खरे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे मूळचे राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीतील, शाहू महारांजाचे महिलांबाबतचे कार्य आपल्याला ज्ञात आहे. त्याच कोल्हापूरातील चंद्रकांत पाटलांनी एका स्त्रीचे म्हणजे ममता बँनर्जीचे छगनराव भुजबळांनी अभिनंदन करुन त्यांचा झाशीची राणी उल्लेख केला म्हणून त्यांच्या नाकाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या समजत नाही. एका महिलेचे कौतुक केले म्हणून एवढे आकांड तांडव करण्याची गरज नव्हती. मा. भुजबळ साहेबांना दिलेल्या धमकीचा मी महाराष्ट्रातील तमाम महिलांच्यावतीने त्यांच्या जाहिर निषेध करीत आहे’, असे मत नगरसदस्या आणि माजी महापौर मंगलाताई कदम यांनी व्यक्त करत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याबद्दल चीड व्यक्त केली.