मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर

0
748

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राज्यातील मनसेचे  एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.  सोनावणे मनसेला रामराम करून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना  हा मोठा धक्का  असेल, असे बोलले जात आहे.  

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून निवडून येत आमदार शरद सोनावणे यांनी राज ठाकरेंना काडीचा का असेना आधार दिला होता. समर्थकांसह शरद सोनावणे  यांनी आज (मंगळवार)  मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान, शिवसैनिकांचा आमदार शरद सोनावणे यांना शिवसेनेत घेण्यास तीव्र विरोध  आहे. बाहेरचा उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नाही, अशी भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली. तर, तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा दिला आहे.