मनमोहन सिंग यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचे हित आहे – उध्दव ठाकरे

0
665

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितल, तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाच हित आहे, असा सूचक सल्ला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप सरकारला दिला आहे.

भारताचा आर्थिक विकास दर घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याचेच समर्थन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार या पुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे, असे या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आर्थिक मंदीचे राजकारण करु नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा, असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घ्या, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.