मतदानासाठीचे ईव्हीएम मशीन माहिती अधिकाराच्या कक्षेत; १० रुपये भरून अर्ज केल्यास माहिती मिळणार

0
403

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागवू शकतो, असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे. दहा रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल, असे आयोगाने नमूद केले आहे.निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबाबत माहिती मागवणारा अर्ज आला असून त्याबाबत मुख्य माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी हा निर्णय दिला आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतर निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या अर्जावर आयोगाला उत्तर द्यावे लागेल किंवा कायद्यानुसार तो अर्ज नाकारावा लागेल. मात्र त्यालाही माहिती आयोगापुढे आव्हान देता येणार आहे. ईव्हीएमचा माहिती या संज्ञेखाली समावेश असून त्याविषयी निवडणूक आयोगाकडे माहिती मागवता येईल, असे माहिती आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.