मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे

0
361

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – मुंबईतील ताडदेवच्या एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए गैरव्यवहारकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना  लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहली यांनी दोषी ठरवले आहे.  आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन महेता यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा. अन्यथा, राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ देखील उघडे पडले आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन महेता यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा. अन्यथा, राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, भ्रष्टचाराचे थैमान घालणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभरातील सत्य हळूहळू बाहेर येणार, असेही त्यांनी म्हटले आहे.