मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर

0
459

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – पिंपरी येथील मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत माजी विद्यार्थी संघ आणि रेड प्लस रक्तपेढी पुणे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते . सदर शिबीर मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत होते . कोविड-१९ च्या या कालावधीमध्ये सुद्धा ऊत्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्राचार्यापासून ते शिपाईपर्यंत सर्वांनी रक्तदान केले. एकूण ९३ बाटल्या रक्त जमा झाले. आजी-माजी विद्यार्थी ऊस्फूर्त पुणे रक्तदान करत असल्याचे दिसून आले .शिवाय स्थानिक नागरीक पण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ . लिना मोदी, माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रा . हेमंत राजेश्त आणि विद्यार्थी समन्वयक कु . अथर्व बर्वे यांनी परिश्रम घेतले. यावेळी रेड प्लस रक्तपेढीचे डॉ. पी . के. शिंदे उपस्थित होते . हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विनीता बसंतानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.