भोसरी विधानसभा मतदारसंघात इरफान सय्यद या नवीन चेहऱ्याची जोरदार चर्चा

0
548

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून लढणाऱ्या संभाव्य नावांमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे चर्चेत असताना आता माथाडी कामगारांची संघटना चालवणारे इरफान सय्यद हे सुद्धा तयारीला लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इरफान सय्यद हे भोसरी मतदारसंघात मोठा जनसंपर्क ठेवून आहेत. ते सध्या शिवसेनेत सक्रिय आहेत. भाजप-शिवसेना युती न झाल्यास शिवसेनेकडून सय्यद हे विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. तसेच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे इरफान सय्यद हे वंचितकडून मैदानात उतरल्यास भोसरी मतदारसंघातील राजकीय गणित बिघडू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.