दापोडीतील घरात सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघींची सुटका

0
462

दापोडी, दि. ८ (पीसीबी) – दापोडी येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.७) दुपारी पावणेसहाच्या सुमारास भोसरी पोलिसांनी दापोडी मधील मंत्री निकेतन येथील घरात केली. तसेच तेथील तीन महिलांची सुटका केली.

याप्रकरणी रेणू रमेश भाटिया (वय ६३, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (वय २५, रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (वय २७, रा. थेरगाव मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (वय २५, रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (वय ३५, रा. रहाटणी मूळ रा. बीड) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील मंत्री निकेतन येथील एका घरामध्ये तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून तीन महिलांची सुटका केली. तसेच वरील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.