भोसरीत भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
512

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – भरधाव रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना भोसरीतील रोशल गार्डन हॉटेलजवळ घडली.

शामराव विठ्ठलराव बिरादार (वय ४२, रा. रोशल गार्डनजवळ, भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरादार हे २० मे रोजी भोसरीतील रोशल गार्डन हॉटेलजवळून पायी जात होते. यावेळी भरधाव रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.