भोसरीत चाकूचा धाक दाखवून खानावळ चालकाला लुटले

0
741

भोसरी, दि. २ (पीसीबी) – खानावळ चालकाला व त्याच्या भावाला चाकूचा धाक दाखवून  १ हजार ७०० रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौकात  शुक्रवारी (दि.१) दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी दोघाजणांना अटक केली आहे.

विलास धाबू ढेबे (वय २२, रा.भारतमातानगर, दिघी) अजय उत्तम भंडारे (वय २१, रा. मोहल्ला प्रियदर्शनी शाळेजवळ, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नितीन सुर्यवंशी (वय १८,रा.भोसरी) हा पसार झाला आहे.

याप्रकरणी भीम नागनाथ पांचाळ(वय २८, रा. सोनावणे वस्ती, हनुमान कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांचाळ यांची आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौकात वैभव नावाची खानावळ आहे. शुक्रवारी दुपारी पांचाळ  आणि त्यांचा भाऊ खानावळमध्ये होते. यावेळी विलास ढेबे यांने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून खिशातील १ हजार ७०० रूपये जबरदस्तीने काढून घेऊन लंपास केले.

अधिक तपास भोसरी पोलीस करत आहे.