भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

0
306

पिंपरी, दि.29(पीसीबी): मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (दि.29) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडला आहे. या अपघातामुळे मुंबईला जाणारी वाहतूक खोळंबली आहे. या अपघातात इतर 4 जण जखमी असल्याचे सांगण्यात येते. 

आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली, त्यामागोमाग आणखी दोन वाहने येऊन अपघातग्रस्त वाहनाला धडकली. या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहनामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

खोपोली पोलिसांनी सामाजिक संघटनांच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले आहे, असे पोलिसानी सांगितले.