भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात – पी.चिदंबरम

0
365

नवी दिल्ली,दि.१२(पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी, भारतातील लोकं कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास करतात. आपल्या देशातील लोकांमध्ये असेलला भोळेपणा मी आतापर्यंत कुठेच पाहिला नसल्याचं म्हटलं आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेच्या अमलबजावणीबाबतच्या दाव्यांवर ते लगेच विश्वास ठेवतात. देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली असल्याचा दावा केंद्रसरकाने केला आहे. तर भारतातील ९९ टक्के कुटंब शौचालययाचं वापर करत असल्याचे सुद्धा सरकार सांगत आहे. लोकांनीही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला, असं पी.चिदंबरम यांनी सांगितलं आहे.

माझ्या गाडीच्या ड्रायव्हरच्या वडिलांच्या सर्जरीसाठी प्रयत्न करूनही आयुष्मान भारत योजनेचा फायदा त्याला मिळाला नसल्याचं उदाहरण चिदंबरम यांनी दिलं. जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये या योजनेबद्दल माहिती घेतली तर, अशी काही योजना नसल्याचं त्याला सांगण्यात आलं, असं पी.चिदंबरम यांनी सांगितलं.