भारतातील रहस्यमयी गुहा, ज्यामध्ये लपले आहे महाभारतातील ‘असे’ रहस्य जे आजवर कोणालाही कळले नाही पण…

0
788

आपल्या देशात भारतात अशा अनेक लेण्या किंवा प्राचीन ठिकाणे आहेत, जिथे काही खास गूढ रहस्य नक्कीच लपलेली आहेत. आज आपण महाभारत काळाशी संबंधित गुहेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एक रहस्य दडलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणालाही या रहस्याबद्दल माहिती नाही आणि इथे असा विश्वास आहे की, हे रहस्य जाणून घेण्याची इच्छा असतानाही कोणताही मनुष्य हे जाणू शकत नाही. ही रहस्यमय गुहा उत्तराखंडमधील गूढ गोष्टींनी भरलेली ही गुहा ‘व्यास गुहा’ म्हणून ओळखली जाते. ती एक छोटी गुहा जरी असली तरी, असे म्हटले जाते की, हजारो वर्षांपूर्वी या गुहेत महर्षि वेद व्यास वास्तव्य करीत होते आणि त्यांनी वेद व पुराणांचे संकलन केले होते. असेही मानले जाते की, या गुहेत वेद व्यासांनी भगवान गणेशाच्या सहाय्याने महाभारत महाकाव्य रचले होते.

वेद व्यास लेणी आपल्या खास छतासाठी देशभर प्रसिद्ध आहे. या गुहेतील छताकडे पाहताना असे दिसते की, बरीच पाने एकावर एक अशी रचून ठेवली आहेत, या छताबद्दल एक रहस्यमय मत आहे. असे म्हटले जाते की, हा महाभारताच्या कथेचा एक भाग आहे, जो महर्षि वेद व्यास आणि भगवान गणेश यांच्याशिवाय कोणालाही माहित नाही.असे मानले जाते की, महर्षि वेद व्यासांनी भगवान गणेशाला महाभारताची ती पाने लिहण्यास सांगितले होते, परंतु त्या पानांना त्या महाकाव्यामध्ये सामील केले नाही आणि त्यांनी त्या पानांना आपल्या सामर्थ्याने दगडात रुपांतरीत केले. दगडाची ही रहस्यमय पाने ‘व्यास पोथी’ म्हणून आज जग विख्यात आहेत.आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हि आहे कि, ते रहस्य नक्की काय होते? जे वेद व्यास जगाला सांगू इच्छित नव्हते. महाभारताचा हा ‘हरवलेला अध्याय’ खरा आहे कि कोणती एखादी गोष्ट आहे, याबद्दल कोणालाही माहिती नाही, परंतु पहिल्या दृष्टीक्षेपात व्यास लेण्याची छप्पर असे दिसते की, जसे काय त्यावर एक महाकाय पुस्तक ठेवलेले आहे.