भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी ठार ; दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त

0
612

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत  आज (मंगळवार) घुसून केलेल्या हल्ल्यात सुमारे २०० दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहेत. तसेच या  हल्ल्यात जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रुम  उद्ध्वस्त झाले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

आज पहाटे साडे तीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी  पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. यात  जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त झाले आहेत.  या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

मिराज २००० विमानांनी हे एअर स्ट्राइक  करण्यात आले. १२ विमाने पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती. सुमारे २१ मिनिटे भारताच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला.  या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे  पाकमधील दहशतवादी संघटनांचे  कंबरडे मोडले आहे.  या कारवाईबद्दल  भारताच्या सुरक्षा दलांनी  कोणतीही माहिती दिलेली नाही.