भारताचा १५० वा कसोटी विजय; तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव

0
617

   मेलबर्न, दि. ३० (पीसीबी) – तिसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५०वा विजय ठरला आहे. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उपहाराच्या विश्रांतीनंतर सुरु झाला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने आज २ गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून जाडेजा, बुमराहने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.  सामन्यात ९ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीरचा किताब देण्यात आला. 

सामन्याच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज माघारी पाठवले. मात्र, पॅट कमिन्सने चौथ्या दिवसाअखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकून भारताचा विजय लांबवला होता. चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलिया ८ बाद २५८ धावा अशी धावसंख्या होती. पाचव्या दिवशी भारतीय संघ विजय साजरा करण्याच्या तयारीत असताना दिवसाची सुरूवातच पावसाने झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाला.

पाऊस थांबल्यानंतर आणि चहापानानंतर सामना पुन्हा सुरू झाला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात भारताला नववी विकेट मिळवून दिली. बुमराहने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पॅट कमिन्सला (११४) माघारी धाडले. त्यानंतरच्या षटकात इशांत शर्माने नॅथन लायनला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर भारताने कसोटी समाना खिशात घातला.