भाजप नेत्याची टीका; “सरकारने मराठा समाजाची घोऱ फसवणूक केली. देवेंद्र फडणवीसांनी केलेला कायदा….”

0
206

मुंबई, दि.०५ (पीसीबी) : आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. आणि त्यानंतर याच कारणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे. ‘हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे तसंच अधिवेशनही बोलवावं’, अशी मागणी यावेळी चंद्रकात पाटलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणाले कि, “हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. फडणवीस सरकारने मागास आयोगाची निर्मिती केली. मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल आला. त्याआधारे विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने कायदा संमत झाला. हायकोर्टाला तीन मुद्दे समजावून सांगण्यात आपण यशस्वी ठरलो आणि त्यावरच सुप्रीम कोर्टात युक्तीवाद झााला. पण महाविकास आघाडी सरकारला आपली बाजू मांडता आली नाही. सरकारमध्ये कोणताही समन्वय नव्हता, संपूर्ण गोंधळ सुरु होता.”

पुढे पाटील असंही म्हणाले कि, ‘मराठा समाजाच्या तरुण तरुणींमध्ये अंधार निर्माण झाला असून मी सरकारचा निषेध करतोय. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे. कोविड आणि मराठा आरक्षण विषयावर विधानसभा अधिवेशन बोलावंल पाहिजे. मराठा समाजाची घोऱ फसवणूक सरकारने केली असून न्यायालयात प्रकरण असल्याचं सांगत आंदोलनाची धार कमी केली. प्रयत्न केले नसल्याने जो येणार होता तोच निर्णय आला. आता आरक्षण मिळण्याची अपेक्षा पूर्णपणे संपली. कारण कोर्टाने प्रकरण प्रलंबित न ठेवता निर्णय दिला असून यासाठी सरकार जबाबदार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“मराठा समाजाची घोऱ फसवणूक सरकारने केली असून न्यायालयात प्रकरण असल्याचं सांगत आंदोलनाची धार कमी केली. प्रयत्न केले नसल्याने जो येणार होता तोच निर्णय आला. आता आरक्षण मिळण्याची अपेक्षा पूर्णपणे संपली. कारण कोर्टाने प्रकरण प्रलंबित न ठेवता निर्णय दिला असून यासाठी सरकार जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला असून याचं पूर्ण खापर, अपयश महाविकास आघाडी सरकारचं आहे”, असंही ते म्हणाले आहेत.