भाजप नगरसेवकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, तरुणीला अटक

0
451

कल्याण, दि. ४ (पीसीबी) – कल्याणमधील भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संबंधित तरुणीने दया गायकवाड यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते.