भाजपा नेत्याचा शरद पवारांना टोला; म्हणाले, ‘सुप्रिया ताईंच्या १० एकरात ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी….’

0
414

नवी दिल्ली, दि.२३(पीसीबी) : प्राप्तिकर विभागानं आपल्याला नोटीस बजावली असून राजकीय विरोधकांना प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटिसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळला असून नोटीस देण्याचा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता असं सांगितलं आहे.

दरम्यान, “सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस,” असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

“कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आलं आहे. सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस,” असं म्हणत भातखळकर यांनी या विषयाची खिल्ली उडवली.