भाजपविरोधात इंच इंच लढवा; राहुल गांधींच्या काँग्रेसच्या ५२ खासदारांना सुचना   

0
469

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) –  प्रत्येक काँग्रेस खासदाराने एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ते संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत आहेत. जात, धर्म आणि वर्ण याचा विचार न करता ते प्रत्येक भारतीयासाठी लढा देत आहेत.  काँग्रेसचे ५२ खासदारच भाजपविरोधात इंच इंच लढवण्यासाठी पुरेसे आहेत,  असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आज ( शनिवारी) दिल्लीत पार पडली. यावेळी खासदारांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी बोलत होते. यावेळी सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी देखील खासदारांना मार्गदर्शन केले.  तसेच सोनिया गांधी यांना देखील शुभेच्छा दिल्या . सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील १२.१३ कोटी मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते.