भाजपला विरोध करणारा ‘देशद्रोही’ हा एक भ्रम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
292

मुंबई, दि.१० (पीसीबी) – सध्याच्या घडीला भाजप जो काही निर्णय घेतो तो देशभक्ती आणि इतरांनी त्यांना विरोध केला तर तो देशद्रोही असा प्रकार सुरू आहे. हा एक भ्रम असून तो बाळगू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले असल्याचं दिसत आहे.

आम्ही कोणाला काय वाटतं या उद्देशाने बाजू मांडत नाही तर राष्ट्रहिताचा विचार करुन भूमिका मांडत असतो. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आम्ही राज्यसभेत समर्थन देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.