‘कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही – एकनाथ शिंदे

0
332

महाराष्ट्र, दि.१० (पीसीबी) –  ‘कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावं याचा सर्वांना अधिकार आहे, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले.