भाजपला बहुमत सिध्द करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

0
527
मुंबई ,दि.२३(पीसीबी) -महाराष्ट्राच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ झाली.आज सकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यांना ३० नोव्हेंबर पर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. अजित पवार आणि देवेद्र फडणवीस यांच्या सोबत २५- ३० आमदार आणि इतर मित्र पक्षांचा पाठींबा असल्याचे सांगितले जात आहे. आता जर हे दोघे विश्वासदर्शक ठराव सिध्द केरू शकले तर राज्यात भाजप सरकार येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.