भाजपमध्ये आपण सुखी; विजयकुमार गावीतांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे वृत्त फेटाळले

0
565

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – भाजपमध्ये आपण सुखी आहोत, असे स्पष्ट करत माजी मंत्री विजयकुमार गावीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. भाजपमध्ये गेलेले गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार असल्याचे  वृत्त आले  होते.  या वृत्ताचे गावित यांनी खंडन केले आहे.  

राष्ट्रवादीला रामराम करून विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गावीत  पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.  त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. दरम्यान  गावित यांनी  भाजपमध्ये आपण सुखी आहोत. जोपर्यंत भाजप आपल्याला पक्षातून काढत नाही, तोपर्यंत आपण येथेच आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

गावित यांनी भाजप सोडणार नसल्याचे वृत्त फेटाळून लावल्याने हा विषय संपला आहे. माझी मुलगी ही खासदार आहे.  केंद्रात ती चांगले काम करत असून कुठलीही तक्रार नाही, असे स्पष्ट करून गावीत यांनी  सर्व अफवा धुडकावून लावल्या.