बंदूक साफ करताना गोळी सुटल्याने पुण्यातील भाजप नगरसेवक गणेश बिडकर जखमी

0
1600

पुणे, दि. २७ (पीसीबी) – बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने पुण्यातील भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. ही घटना आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी बीडकर हे वढू जवळील अपटी या गावात असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास ते त्यांची पिस्तूल साफ करत असताना एक गोळी त्यांच्या पायाला लागली आणि ते गंभीर जखमी झाले. यावर बीडकर यांना तातडीने पुण्यातली एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायातली गोळी काढण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.