भाजपने हे काय जन्माला घातलंय, मुंडकं गाढवाचं अन् धड रेड्याचं – उद्धव ठाकरे

0
367

मुंबई,दि.२५(पीसीबी) – देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने हे काय जन्माला घातलंय ? मुंडकं गाढवाचं आणि धड रेड्याचं असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. त्यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवू असं सांगणारे भगतगण फडणवीस ‘अजित पवार आगे बढो’च्या घोषणा देत होते. मात्र अजित पवार त्या जल्लोषात कुठेच दिसत नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राची जनता ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहे, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

लाडू भरवताना तो त्यांच्या नरड्याखाली उतरत नव्हता आणि चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. पण हे लाडू त्यांना पचतील का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे.