भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त राम मंदिराचे पुन्हा आश्वासन  

0
635

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकासाठी आज (सोमवार) भाजपने प्रसिद्ध केलेल्या   ‘संकल्पपत्रा’त राम मंदिर निर्मितीचे पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे. यावेळी पंतप्रधान  मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण  आदी  नेते उपस्थित होते.

भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र  असे नांव दिले आहे. संकल्पपत्रात भाजपने राम मंदिर निर्मितीचे पुन्हा एकदा भाजपने आश्वासन दिले आहे. भाजपचे संकल्पपत्र २०२४ साठी आहे. पण स्वातंत्र्याला  ७५ वर्षपूर्ती निमित्त २०२० पर्यंत आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

देशाला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘वन मिशन, वन डायरेक्शन’ आम्ही पुढे जाणार आहोत. देशात अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. याबाबत ठोस पाऊल उचलण्याच गरज आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार आहे,  असे मोदींनी सांगितले.