भाजपचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम – संजय राऊत

0
722

पंढरपूर, दि. २३ (पीसीबी) – भाजपचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे. मात्र हे प्रेम ‘भाजप’ आमच्यावर लादत आहेत, असे मिश्किल विधान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (रविवार) येथे केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच शिवसेनेने युती करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवल्याचा दावाही भाजपच्या एका माजी मंत्र्याने केला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी युतीवर बोलताना भाजपला टोला लगावला आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.  तर  शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवल्यामुळे भाजप ही अट मान्य करणार का?   युतीची बोलणी  पुढे  सरकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.