भव्य मेहंदी ऑनलाईन स्पर्धेचं आयोजन ,सहभागी व्हा !

0
250

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : पिंपंरी चिंचवड महानगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविका आशा धायगुडे -शेंडगे यांनी शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन मेहेंदी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे … हि स्पर्धा १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार आहे .. या स्पर्धेत जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला ११ ऑगस्ट पर्यंत नावनोंदणी करावी लागेल …

स्पर्धेचे नियम

१. स्पर्धाकाने आपले नाव, पत्ता, फोटो, मोबाइ नंबर सह पाठवणे आवश्यक.

२ मेहंदी पूर्ण झालेला फोटो त्वरीत दिलेल्या नंबर वर पाठवणे.

३. स्पर्धा Google Meet द्वारे Live घेतली जाणार आहे.

तरी Google Meet अॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक ४. लाईव्ह स्पर्धा असल्याने पूर्ण वेळ आपला कॅमेरा चालू असणे आवश्यक.

५. मेहंदी स्वतःच्या किंवा मॉडेलच्या हातावर काढायची आहे.

६. मेहंदीची डिझाईन आपल्या आवडीने काढायची आहे. ७. मेहंदी स्पर्धेचा कालावधी १ तास असणार आहे.

७. स्पर्धेपूर्वी १० मिनिट आधी गुगल लिंक कार्यान्वित करण्यात येईल ,सहभागासाठी तुम्हाला ७२७६२७१७११ या क्रमांकावर संपर्क करायचा आहे ….

या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन नगरसेविका आशा धायगुडे -शेंडगे यांनीं केलंय … त्याचप्रमाणे या स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट रोजी सितांगण उद्यान ,कासारवाडी या ठिकाणी जाहीर केला जाईल ,अशी माहितीही त्यांनी दिली ..