भयंकर! साउंड सिस्टीमचा आवाज कमी करण्यास सांगितला म्हणून त्याने केले सुरीने वार

0
219

तळेगाव दाभाडे, दि. २४ (पीसीबी) : घरातील साउंड सिस्टीमचा आवाज बंद करण्यास सांगितल्यावरून एकावर सुरीने वार केले. याबाबत एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडी येथे घडली.

पोपट सोपान दाभाडे (वय 40, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत संजय सोपान दाभाडे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोपट आणि फिर्यादी संजय हे भाऊ आहेत. पोपट याने त्याच्या घरातील साउंड सिस्टीमचा आवाज मोठा केला. त्यामुळे फिर्यादी संजय यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून पोपट याने संजय यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुरीने संजय यांच्या मानेवर व डोक्यावर मारून जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.