ब्ल्यू प्रिंट नाही ब्ल्यू फिल्मच काढायला हवी होती लोकांनी पाहिली असती- राज ठाकरे

0
509

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट देणारा पहिला पक्ष मनसे होता असे म्हणत राज ठाकरेंनी २०१४ चीही आठवण केली. मी माझ्या पहिल्या सभेत ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख केला. मला कायम विचारले जायचे की ब्ल्यू प्रिंट कधी आणणार? जेव्हा मी जेव्हा ब्ल्यू प्रिंट समोर आणली तेव्हा एकाही पत्रकाराने पाहिली नाही. काही दिवसांपूर्वी मला पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले तुमच्या ब्ल्यू फिल्मचे काय झाले? ब्ल्यूफिल्म? काय बोलायचे? पण आता वाटते आहे की ब्ल्यू प्रिंटऐवजी ब्लू फिल्म काढली असती तर बरे झाले असते लोकांनी ती पाहिली तरी असती. पत्रकारांनी वारंवार पाहिली असती असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

ईडीची चौकशी करा किंवा काहीही करा, माझे बोलणे थांबणार नाही असे मी ईडी कार्यालयाबाहेर आल्या आल्या सांगितले होते. मला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. गोरेगाव या ठिकाणी ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांताक्रूझ पाठोपाठ गोरेगाव या ठिकाणीही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. माझी मावशी गोरेगावत रहात असे त्यावेळी जास्त येणे व्हायचे. आता तेवढे येणे होत नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना आपल्या भाषणातून उजाळा दिला.