बेस्टचा संप आज न मिटल्यास तमाशा करणार; मनसेचा इशारा

0
694

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मुंबईत बेस्टचा संप आज सातव्या दिवशीही सुरू आहे. या प्रकरणी आज न्यायालयातही सुनावणी होणार आहे. पण संपावर आज तोडगा निघाला नाही तर ‘तमाशा’ करणार, असा इशारा मनसेने दिला आहे. 

बेस्ट संपावर तोडगा निघत नसल्याने कर्माचरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. या भेटीत बेस्ट कुटुंबीयांनी राज ठाकरेंसमोर आपल्या समस्या मांडल्या. आता आमच्या पद्धतीने समस्या सोडवू, असे आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी बेस्ट कुटुंबीयांना दिले होते.

आता बेस्ट संपावर आज तोडगा निघाला नाही तर मनसे प्रत्यक्ष संपात उतरणार आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर जो काही तमाशा होईल यासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. यामुळे बेस्ट संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.