बिहारी लोक येथे राहतात, तिकडे त्यांच्या बायकांना मुले होतात; सुरेश धसांची जीभ घसरली

0
2607

बीड, दि. ६ (पीसीबी) – बिहारी लोक  येथे राहतात. आणि तिकडे त्यांच्या बायकांना मुले होतात, असे वादग्रस्त विधान बीड विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांनी केले आहे.  या विधानामुळे नवा वाद निर्माण  झाला  असून धस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

धस यांनी बिहारी समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधात टीका केली जात आहे. बिहारचे लोक येतात आणि पेढा देतात. काय झाले, असे त्यांना विचारले तर मुलगा झाला असे सांगतात. कुठे झाला तर तिकडे झाला. ते राहतात येथे आणि त्यांना मुले तिकडे होतात, असे  धस यांनी एका जाहीर सभेत म्हटले. या विधानावर उपस्थितांनी  हसून दाद दिली. मात्र, यामुळे  धस  वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची  शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वीही भाजपचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पंढरपूर येथील प्रचार सभेत लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत असेच वादग्रस्त  विधान केले होते.  त्यानंतर आता सुरेश धस यांनी असे विधान केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.