बारावीच्या परीक्षेत रिंकू राजगुरू ‘सैराट’; ८२ टक्के गुण

0
428

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) – ‘सैराट’या चित्रपटामुळे  प्रसिध्दीच्या झोतात  आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू  बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत.  या यशाबद्द्ल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवार)  जाहीर झाला. रिंकूने टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून १२ वीची परीक्षा दिली होती.

रिंकू नियमित कॉलेजला जात नसल्याने तिने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षा दिली होती. तिने कला शाखेतून परीक्षा दिली होती. यावेळी तिचे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय होते.