बांधकाम साईटवरून मजुराचा मोबाईल चोरीला

0
227

चऱ्होली, दि. ९ (पीसीबी) – वडमुखवाडी येथे यशोभुमी कन्स्ट्रक्शन या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या एका मजुराचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना 19 ते 25 मे या कालावधीत घडली.

हेमचंद जीवराखन डेहरे (वय 36, रा. यशोभुमी कन्स्ट्रक्शन, स्पाईन रोड, वडमुखवाडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 8) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमचंद हे वडमुखवाडी येथील यशोभुमी कन्स्ट्रक्शनवर काम करतात. 19 ते 25 मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांचा तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत