बदलत्या परिभाषेसह सर्व प्रसिद्धिमाध्यमे एकमेकांस पूरक; माध्यम संवाद परिषदेत मान्यवरांचा सूर

0
368

निगडी, दि. २४ (पीसीबी) – “प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आता डिजिटल व समाजमाध्यमे (सोशल मीडिया) अशा प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रदीर्घ प्रवासात माध्यमांची परिभाषा बदलली असली, तरी सर्व प्रकारच्या माध्यमांची उपयोगिता व आवश्यकता कायम आहे. सद्सद्विवेक बुद्धीने यांचा वापर झाल्यास प्रत्येक माध्यम समाजजागृतीसाठी उपयोगी ठरेल,” असे मत विश्व संवाद केंद्र, पुणे व स्वातंत्रवीर सावरकर मंडळ, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘माध्यम संवाद परिषदे’त प्रमुख सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमकर्मी व संबंधित अभ्यासकांचा परस्पर परिचय, संवाद व्हावा, माध्यमांतून सकारात्मकता वाढीस लागावी, या हेतूने या परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि.20) रोजी निगडी येथील सावरकर सदनातील कॅप्टन जी. एस. कदम सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी गरवारे महाविद्यालयाचे पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. विनय चाटी, ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन तसेच सोशल मीडिया तज्ज्ञ अजिंक्य कुलकर्णी या मान्यवरांनी आपले विचार मांडले. भारतमाता प्रतिमा, संत तुकोबाराय – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती-शक्ती शिल्पाचे पूजन तसेच अनिरुद्ध सराफ यांच्या सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय विचार साधना निर्मित ‘स्वराज्य 75’ विषयावरील लघुपट या वेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्व संवाद केंद्रातर्फे सारंग पापळकर यांनी तर मानसी मगरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सावरकर मंडळाचे सचिव प्रदीप पाटील यांनी मंडळाची माहिती दिली, तर मंडळाचे रमेश बनगोंडे, महेश्वर मराठे, भास्कर रिकामे, राजेंद्र देशपांडे, सागर पाटील, निवेदिता कच्छवा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

मान्यवरांनी आपले अनुभव, माहिती तसेच विविध उदाहरणांवरून माध्यमांची बदललेली परिभाषा, स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील माध्यमे, त्यांतील स्थित्यंतरे, समाजमाध्यमांचा प्रभाव यासोबतच माध्यमातून होणारे जनतेचे प्रबोधन, मनोरंजन यासह मुद्रित, आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांच्यातील बदल, तसेच इंटरनेट व मोबाईलचे आगमन आणि डिजिटल माध्यमांतील आव्हाने अशा विविध विषयांना स्पर्श करत प्रसिद्धी आणि समाज माध्यमांचा वापर सद्सद्विवेक बुद्धिने करून समाजाभिमुख भूमिका ठेवण्याचे आवाहन ही या वेळी केले. परिसंवादावेळी काही प्रश्नांवर सभागृहातील वातावरण अतिशय धीरगंभीर, कधी बोलके तर काही वेळेला हास्याचे कारंजे उडत होते. परिसंवादात मान्यवरांना बोलते करण्याचे काम एमपीसी न्यूजचे संपादक (फीचर – आर अँड डी) राजन वडके यांनी उत्तम पद्धतीने केले.

समारोपीय सत्रात भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी माध्यमकर्मींनी आपल्या सामाजिक दायित्वाची जाणीव तसेच ‘राष्ट्र सर्वोपरी’ ही भावना कायम ठेऊन सकारात्मकतेने एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी वाचकांचे मनोगत सदरात विक्रमी पत्रलेखक पुरस्कार प्राप्त शांताराम वाघ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. प्रवीण कोठावदे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. सुचेत गवई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, न्यूज वेब पोर्टलचे संपादक, पत्रकार, व्याख्याते, लेखक, पत्रकारितेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.