‘बघाच तो व्हिडीओ’; भाजपचे राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला प्रत्युत्तर  

0
760

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ‘लाव रे तो व्हिडीओ’ असा म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींची जाहीर सभेतून पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या तोंडचे पाणी पळाले. आता राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप सरसावला असून ‘बघाच तो व्हिडिओ’ या माध्यमातून  राज यांना उत्तर दिले जात  आहे.

वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात भाजपची आज (शुक्रवार) सभा  झाली. यावेळी राज ठाकरे यांना भाजपकडून त्यांच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवून त्यांची पोलखोल करण्यात आली.

याबाबत बोलताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी आहे.  पण वेळेअभावी १९ प्रकरण दाखवण्यात आली.  असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरें तुमची प्रवृती आहे. खोटे बोल, रेटून बोलं म्हणजे राज ठाकरे अशी टीका शेलार यांनी केली. दरम्यान, आशिष शेलार हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी  आपल्या भाषणामध्ये ‘मित्रा तू खरचं चुकलास’ असे  म्हटले आहे.