फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह बनल्या राफेल लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक!

0
190

नवी दिल्ली,दि.२४(पीसीबी) : फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच 10 सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती. ही विमानं हवाई दलाच्या 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनचा भाग बनली. आता याच राफेलची वैमानिक हि एक महिला आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. त्यांना देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. सध्या त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहेत.

शिवांगी सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या आहेत. न्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये त्या औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते.

त्यामुळे सध्या त्या मिग-21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढं आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेलं मिग-21 हे जगातील दुसरं सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेलं विमान आहे.

भारत-चीन यामधील तणावग्रस्त वातावरणामुळे भारतीय हवाई दलाने राफेल विमानं एलएसीवर तैनात केली आहेत.