फोनवर बोलत असताना पत्नीवर संशय घेऊन बेदम मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

0
344

पिंपळे निलख, दि. 17 (पीसीबी) : पत्नी फोनवर बोलत असताना तिच्यावर संशय घेऊन पतीने हायड्रोलिक ऑइल पाइपने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री विशाल नगर, पिंपळे निलख येथे घडली.महेश खेमराज नेपाळी (वय 25 रा. तनिष्का बिल्डिंग, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी पत्नी या हाऊसकिपिंग करणाऱ्या मालकीणीशी (नाव माहित नाही) यांच्यासोबत फोनवर बोलत होत्या. त्यावेळी दारासमोर उभ्या असलेल्या आरोपी पती महेश याने “तु कोणा सोबत बोलत होती?’ अशी विचारणा केली तसेच फिर्यादी पत्नीस हायड्रोलिक ऑइल पाइपने पाठीवर, मांडीवर, हातावर, कानावर मारून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.