फोटोग्राफर राजेश एम पवार यांना पुणे शहर शिवसेना चित्रपट सेनेकडून फोटोग्राफी स्पर्धेत पारितोषिक

0
509

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : रहाटणी, जगताप डेअरी येथील फोटोग्राफर राजेश एम पवार यांना पुणे शहर शिवसेना चित्रपट सेनेने १९ ऑगस्ट या जागतिक फोटोग्राफी दिना निमित्त आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात डेक्कन येथील शिवसेना भवनात पार पडला. या प्रसंगी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस किर्तीताई फाटक उपस्थित होत्या. राजेश एम पवार यांना या आधी विविध ९ पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम बंगालच्या ‘एक्स्पोजर’ मॅगझीनच्या एडिटर चॉइस च्या कव्हर पेजवर त्यांनी काढलेले ग्रेटर फ्लेमिगोंचे छायाचित्र प्रकाशित झाले आहे. राजेश एम पवार यांना फोटोग्राफी तील ३० वर्षांचा अनुभव असून हे ९ पुरस्कार गेल्या ४ वर्षांत मिळाले हे उल्लेखनीय आहे. राजेश एम पवार यांना मिळालेले पुरस्कार या प्रमाणे….

* वर्ष २०१७ पुणे फोटोग्राफर असोसिएशनच्या एकाच स्पर्धेत पुरस्कारांची हॅट्रीक (३ पुरस्कार)
* २०१८ पुणे असोसिएशनच्या सातारा भागात झालेल्या आउट डोअर स्पर्धेत दोन पुरस्कार.
* २०१९ पुणे फोटोग्राफर असोसिएशन आयोजित लॉकडाउन काळ स्पर्धेत पुरस्कार.
* २०२० नाशिक फोटोग्राफी क्लब आयोजित लॉकडाउन ऑनलाईन स्पर्धेत पुरस्कार.
* २०२१ पुणे औंध येथील वेस्टेंडमॉल मधील ऑन द स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत पुरस्कार
* २०२१ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे शिवसेना चित्रपट सेना आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत पुरस्कार.
* राष्ट्रीय स्तरावरील विविध फोटोग्राफी सलोननमध्ये अनेक एक्सेप्टेन्स अवार्ड.
राजेश एम पवार हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील नसून गेल्या पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड मधिल रहाटणी- जगताप डेअरी येथे वास्तव्यास आहेत. कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता त्याचा ध्यास ठेवल्यास यश नक्की मिळते हेच माझ्या या यशाचे गमक असल्याचे राजेश एम पवार यांनी सांगितले.