फडणवीसजी ‘तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार’ नागपुरात भाजप नेत्यांची बॅनरबाजी

0
477

महाराष्ट्र, दि.१७ (पीसीबी) –  नागपूर मध्ये कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह ‘तुम्ही पुन्हा येणार’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या पोस्टरबाजीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार “, अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही कार्यकर्त्यांचेही फोटो आहेत. हे फोटो नागपूर शहरातील भाजप आमदार आणि नेत्यांनी लावल्याची माहिती समजत आहे.