‘प्लीज माझ्या लग्नाला या’; राखी सावंतचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

0
1665

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती.  त्यानंतर पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून निक-प्रियांकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.  ही पोस्ट वाचल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतनेदेखील पंतप्रधान मोदींना आपल्या लग्नाचे निमंत्रण ट्विट करून  दिले आहे.

‘व्वा, पंतप्रधान मोदीजी प्रियांका-निकच्या आनंदात तुम्ही सहभागी झालात ही फारच छान गोष्ट आहे. माझेदेखील लग्न ठरले आहे. येत्या ३१ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता माझे लग्न होणार आहे, त्यामुळे प्लीज माझ्या लग्नात या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, असे राखीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कलानगरीत दीप-वीर आणि निक-प्रियांकाच्या लग्नाची  जोरात चर्चा झाली. आता राखीनेदेखील दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. तिच्या लग्नाविषयी तिने सोशल मीडियावर काही पोस्टही केल्या होत्या. त्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आता तिने तर पंतप्रधान मोदी यांना    लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राखीच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.